महायुतीत इंदापूरच्या जागेवरून तिढा असतानाचं आ.भरणे म्हणाले
आय मिरर
अद्याप महायुतीचं जागावाटप झालं नाही आणि इंदापूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण झालाय.अशात इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपण पुन्हा एकदा इंदापूरचे विधानसभा लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आमदार भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील भादलवाडी तलावाचं गुरुवारी दि.05 सप्टेंबर रोजी जलपूजन पार पडले आहे. यावेळी संबोधन करताना भरणे यांनी तुम्हीच सगळे मामा आहेत म्हणून पावणा रावळा जेवढ काही करता येईल तेवढा प्रयत्न करा असं आवाहन केलं आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसापासून इंदापूर विधानसभेवर भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांंनी युतीच्या वाटपात ही जागा आपल्याला मिळावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही आहेत अद्याप इंदापूरच्या जागेवर महायुतीच्या नेत्यांकडून ठोस भूमिका आलेली नाही. दरम्यान 23 ऑगस्ट रोजी इंदापुरातील जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते, त्यानंतर आमदार भरणे यांनी आज आपण इंदापूरची निवडणुक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.
भरणे म्हणाले की,आपण कधीही जवळचा लांबचा गट तट पाहिले नाही प्रत्येकाला मदत केली आहे. आता काहीजण येथील त्यांना जीव घाला वरून ताक प्यायला म्हणजे ढेकर देऊन जातील. निवडणुकी पुरता मामा नाही मी निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुमच्या सोबत आहे. निवडणुकीपुरता यायचा आणि गोड बोलायचं आणि पावणे पाच वर्ष गायब व्हायचं असा मी नाही. असं मनात भरणे यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
What's Your Reaction?