डिकसळच्या उपसरपंचपदी मंदा शिंदे बिनविरोध,दोन सदस्य गैरहजर 

Jul 19, 2024 - 18:19
 0  616
डिकसळच्या उपसरपंचपदी मंदा शिंदे बिनविरोध,दोन सदस्य गैरहजर 

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

डिकसळ (ता‌.इंदापूर) येथील उपसरपंच पदी मंदा विजय शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच जयश्री सवाने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाची निवड करण्यासाठी ग्रामसेवक प्रतिभा देवकाते यांनी सरपंच मनीषा गवळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावली होती. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्या मंदा शिंदे यांची उपसरपंच म्हणून निवड करण्याची सूचना ग्रामपंचायत सदस्य संदीप भोंग यांनी मांडली या सूचनेला उपस्थित सदस्यांनी मान्यता दिली निर्धारित वेळेत मंदा शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक प्रतिभा देवकाते यांनी मंदा शिंदे यांची डिकसळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 

एकूण नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये दोन सदस्य गैरहजर राहिले.तर एक जागा रिक्त आहे. सभेस सरपंच मनीषा संदीप गवळी ग्रामपंचायत सदस्य संदीप भोंग, दत्ता पवार, ग्रामपंचायत सदस्या जयश्री सवाने, मनीषा पवार, ज्ञानेश्वरी कुंभार आदी सदस्य उपस्थित होते. 

यावेळी बोलताना नुतन उपसरपंच मंदा शिंदे यांनी आपण सर्व सदस्यांना बरोबर घेऊन गावच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.निवडीनंतर योगेश्वरी मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने मंदा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow