इंदापूरात सुनेत्रा पवारांचा पुर्ण ताकदीने प्रचार करणार - भाजपा पदाधिकाऱ्यांची अजित पवारांना ग्वाही

Apr 17, 2024 - 18:16
 0  1369
इंदापूरात सुनेत्रा पवारांचा पुर्ण ताकदीने प्रचार करणार - भाजपा पदाधिकाऱ्यांची अजित पवारांना ग्वाही

आय मिरर

राज्यांचे उपमुख्यमंञी अजित पवार हे 2024 चा लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बुधवारी 17 एप्रिल रोजी इंदापूर तालुक्यात प्रथमच आले होते.अजित पवारांनी आजच्या दौऱ्यात इंदापूर शहरातील डॉक्टर वकील आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने अजित पवारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून महायुतीच्या उमेदवार सुनेञा पवार यांचा भाजप पुर्ण ताकदीने प्रचार करणार असल्याची ग्वाही देण्यात आली.भाजपचे सर्व पदाधिकारी पुर्ण वेळ प्रचाराचे काम करत आसून तळागाळापर्यंत उमेदवार व चिन्ह पोहचवत आहेत अशी माहिती यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे यांनी दिली.

यावेळी माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य माऊली चवरे,ओबीसी मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे,पंचायत राज आघाडीचे प्रदेश सहसंयोजक माऊली वाघमोडे,तालुकाध्यक्ष शरद जामदार,विष्णुपंत मकर,काटी वडापुरी गटाचे प्रभारी,ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदिप आदलींग,ओबीसी मोर्चा पुणेजिल्हा सरल ॲप प्रमुख सुयोग सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow