मदनवाडीतील संपत बंडगर यांची कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी निवड 

Feb 5, 2024 - 20:47
Feb 6, 2024 - 14:34
 0  825
मदनवाडीतील संपत बंडगर यांची कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी निवड 

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील संपत शिवदास बंडगर यांची कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली आहे.सोमवारी दि.०५ रोजीकारखान्याचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले असुन या निवडी नंतर बंडगर यांच्या वरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

संपत बंडगर यांनी भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत बंडगर यांनी त्यांचा पराभव केला होता.नंतरच्या काळात हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर संपत बंडगर भारतीय जनता पार्टीत सहभागी झाले होते. आता या निवडीनंतर संपत बंडगर यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याचे बोलले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow