इंस्टाग्राम वरील ओळखीतून झालेल्या विवाहाला होता बापाचा विरोध ; मग काय जावयाच अपहरण केलं अन् बेदम मारलं 

Feb 12, 2025 - 08:43
 0  1046
इंस्टाग्राम वरील ओळखीतून झालेल्या विवाहाला होता बापाचा विरोध ; मग काय जावयाच अपहरण केलं अन् बेदम मारलं 

आय मिरर 

सध्या सोशल मीडियात विविध प्लॅटफॉर्मवर अनेक जण सक्रिय आहेत.यातूनच पुढे मैत्री निर्माण होते, जवळीक वाढते आणि याच रूपांतर प्रेमात होतं असे एक ना अनेक किस्से आपण ऐकले आहेत. 

कोल्हापूर मध्ये देखील असाच एक किस्सा घडलाय.सुरुवातीला ते दोघे इंस्टाग्राम वर एकमेकांना भेटले त्यांच्यात मैत्री वाढली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि शेवटी त्यांनी लग्नही केलं. मात्र याच लग्नाला मुलीच्या बापाचा विरोध होता याचा परिणाम म्हणून बापाने जावयाचं अपहरण केलं आणि त्याला बेदम मारलं ! शेवटी पोलिसांनी या जावयाची सासर्‍याच्या ताब्यातून मुक्तता केली. याप्रकरणी मुळीच्या वडिलांसह तिघांना सांगलीतून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला. पण या विवाहला विरोध करत मुलीच्या वडिलांनी जावयाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. यातील तरुणाची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सांगलीच्या मिरजेतून सुटका केली.

याप्रकरणी मुलीचे वडील श्रीकृष्ण महादेव कोकरे यांच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. कोकरे यांच्या मुलीची कोल्हापुरातील भुयेवाडी येथील तरुणाशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. सात महिन्यांपूर्वी त्यांनी पळून जाऊन लग्न केले. याचा राग कोकरे यांना होता. याच रागातून जावयाचे अपहरण केले आणि त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणात कोकरे यांना मदत करणाऱ्या दोघांना ही ताब्यात घेतल आहे. पोलीस हा प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow