तरच जनता शांत होईल; माजी गृहमंत्री अनिल देशमुख बारामतीत काय म्हणाले...
आय मिरर
संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो कोणी दोष असेल त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे त्यामुळे जनता शांत होईल अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बारामती मध्ये दिली आहे.
बारामतीतील एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आलेला आहे. याला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली.यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.यावेळी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कौतुक देखील केले.
वाल्मीक कराड यांची ईडी चौकशी का होत नाही असा सवाल सातत्याने विचारला जातोय त्यावरती अनिल देशमुख यांना हा प्रश्न विचारला असता अनिल देशमुख म्हणाले देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारला पाहिजे असंही ते म्हणाले.
बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रातील प्रदर्शन पाहून शेतकऱ्यांना नक्की काहीतरी शिकायला मिळेल अशी भावना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?