'पालकमंत्र्यांचा बदल,नेमणूका हा सरकारच्या कामकाजाचा भाग' मात्र भविष्यातही इंदापूरला भाजपाकडून झुकता निधी मिळणार - अँड.शरद जामदार
आय मिरर
राज्यातील महायुती सरकार मधील मोठा भाऊ असलेल्या भाजपकडून इंदापूर तालुक्याच्या विकास कामांना आगामी काळातही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुका हा विकास कामांमध्ये अग्रभागी राहील, अशी ग्वाही इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी बुधवारी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील काही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची बदल यादी आज जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विविध चर्चा संदर्भात अँड. जामदार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पालकमंत्र्यांचा बदल, नेमणूका हा सरकारच्या अंतर्गत कामकाजाचा भाग असून तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हे भाजप -शिवसेना - राष्ट्रवादी या तीन पक्षाचे आहे. पालकमंत्री हे एका पक्षाचे नसतात ते सरकारचे व जिल्ह्याचे पालकमंत्री असतात, असे अँड शरद जामदार यांनी नमूद केले. राज्यात गेली एक वर्षांपासून महायुतीचे सरकार सत्तेवर आले पासून, इंदापूर तालुक्यात विकास कामांचा ओघ वाढला असून, भाजपा तालुक्याच्या विकासाठी कटिबद्ध असल्याचे अँड.जामदार यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?