माळेगाव कारखान्याचा पुढचा चेअरमन मीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Jun 15, 2025 - 06:43
 0  412
माळेगाव कारखान्याचा पुढचा चेअरमन मीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

आय मिरर 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पुढचा चेअरमन मीच असेल अशी घोषणा केली आहे. माळेगाव कारखान्याची निवडणूक लागलेली आहे आणि अजित पवार स्वतः ब वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणुकीत उभे आहेत.

शनिवारी 14 जून रोजी बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील श्री निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अजित पवारांनी पुढील पाच वर्ष आपणच माळेगाव कारखान्याचा चेअरमन असल्याची घोषणा केली आहे.

तुम्ही पॅनल टू पॅनल कप बशी मतदान करा, प्रचंड मताने आपला पॅनल निवडून येणार आहे.पुढचा चेअरमन देखील मीच होणार अस अजित पवारांनी म्हटलं. महाराष्ट्रातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये दर देण्यामध्ये माळेगावचं नाव नाही आणलं तर नाव सांगणार नाही असा दावाही अजित पवारांनी यावेळी केला.

याच सोबत उद्याच्याला बारामतीचा आमदार माळेगावचा चेअरमन असल्यावर साखर आयुक्त सहकार मंत्री तुमचं काम टाळलं का ? बाळासाहेबाला मंत्री मी केलं असही अजित दादांनी म्हटलं आहे.

एखाद्याला नाही निवडून आणायचं म्हटलं तर मी काय करू शकतो हे पुरंदरने पण बघितलं आणि शिरूर ने पण बघितलं असं अजित पवारांनी बारामतीत म्हटल आहे. अजित पवारला सहकार मोडीत काढायचा असता तर 50 कोटी दिले असते का संस्थांना पेट्रोल पंप दिले असते का ? काहीही सांगता असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांनाही खडे बोल सुनावले आहेत.

तुम्ही मला 91 ला जबाबदारी दिली जोपर्यंत माझे हात हलताहेत तोपर्यंत तुमचं भलच करेन हा माझा शब्द आहे. ज्या दिवशी मला वाटेल माझ्यापेक्षा जास्त उजवा बारामती तालुक्यात आला त्या दिवशी माझा मी बाजूला जाईल. असही अजितदादांनी म्हटल आहे.

उभ्या केलेल्या कोणत्याही संचालकाला दिलेलं मत म्हणजे अजित पवारला आहे असं समजायचं.अजित पवार ची मान ताठ ठेवायची की नाही हे तुमच्या हातात आहे. पाच वर्षे मीच चेअरमन राहणार अजिबात बदलणार नाही.उन्हाळ्यात पाणी अजित पवार देतो कॅनल बंद होऊ दिला का ? नाही ना असं म्हणत ऑल इज वन कुठलंही काम असू द्या फक्त माळेगावच नव्हे तर इतर कोणतेही असावे माझ्याकडे या हा फक्त होण्यासारखं असावं अजित पवार यांनी म्हटलं.

विरोधक म्हणतात अजित पवार सहकार मोडीत काढाय निघाले आहेत. जाऊन बघा अजित पवार सासरवाडीत जाऊन सहकारी साखर कारखाने कसे चालवत आहेत, हे तर माझं माहेर आहे इथलं सगळं चित्रच बदलून टाकतो.सगळं चकाचक करून टाकतो फक्त वीस च्या वीस संचालक निवडून द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

मला सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे.मी स्वार्थी नाही,मी मतलबी नाही.मला माझ्या स्वतःच्या हयातीमध्ये जितके दिवस तुम्ही मला साथ देणार आहे तोपर्यंत तेवढे मला इथल्या संस्थांना आणि तुम्हाला भरभरून देता येईल ते देण्याच्या करता माझी सगळी ताकद मी पणाला लावणार आहे त्यातून मी माघारी घेणार नाही.

माळेगावचे भलं करायचं असेल तर अजित पवारच...

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे भलं करायचं असेल तर तो फक्त अजित पवारच करू शकतो असा दावाही अजित पवार यांनी या जाहीर सभेत केला.कारखाने अडचणीत आहेत.अरे आपल्या बाप ज्यादाने उभा केलेली कारखानदारी वाचवायची आहे,त्यासाठी कारखाना चालवायची धमक लागते.माझ्यात लाथ मारीन तिथून पाणी काढण्याची धमक आहे.तुम्ही मला आठ वेळा निवडून दिल आहे.एकदा खासदार केलं मी कामाचा माणूस आहे.पावणेसाला उठून कुठला आमदार आहे काम करणारा मी माझं काम करत नाही जनतेचे काम करत असतो.जीव ओतून काम करावे लागते. विरोधक म्हणतात की मळेगाव कारखान्यातून पाच वर्षात होत्याचं नव्हतं केलं राज्याचे उपमुख्यमंत्र्याला फॉर्म भरावा लागतोय, मी म्हणतो तुमच्या का पोटात दुखतय ? मी वर्गाचा प्रतिनिधी आहे माझं काही चुकलं असा संवाद ही अजित पवार यांनी विरोधकांना केला.आम्ही विरोधकांना ही नमस्कार केला आणि जवळच्यांना ही केला कारण त्यांचं भलं आम्हाला माहित आहे. विरोधक म्हणतात की अजित पवार अण्णाच्या ताटात पाणी टाकतात कोण पाणी टाकतोय अन्नाच्या ताटात जास्त अन्न टाकायची धमक अजित पवार जात आहे. असं ही दादा म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow