भिगवण च्या उपसरपंच मुमताज शेख यांचा राजीनामा
आय मिरर(निलेश मोरे)
इंदापूर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मुमताज जावेद शेख यांनी राजीनामा दिला असून दि.३० सप्टेंबर रोजी झालेल्या मासिक सभेत तो मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सरपंच दिपीका क्षीरसागर यांनी दिली.
मुमताज शेख यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकाभिमुख कामे केल्याने त्या अल्पावधीतच लोकप्रिय उपसरपंच म्हणून नावारूपाला आल्या होत्या. विशेष म्हणजे ऐन उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना पाणीपुरवठा विभागाचे योग्य नियोजन त्यांनी केले. व गावामध्ये सुरळीत पाणीपुरवठा करून पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू दिली नाही.
उपसरपंच कोण होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष
राजीनामा मंजूर झाल्यानंतर सरपंच दिपीका क्षीरसागर या लवकरच उपसरपंच पदाची निवडणूक जाहीर करणार आहेत. यामुळे नवा उपसरपंच कोण होणार,याकडे भिगवणसह पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
What's Your Reaction?