पूजा खेडकर कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघडकीस ; सातबारावर धोंडीबा चे केलं कोंडीबा
आय मिरर
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे असलेल्या 14 गुंठे जमिनीच्या सातबारातील आपल्या नावातील वडिलांचे नाव बदलले आहे. दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केला आहे.
दिलीप धोंडीबा खेडकर यांनी 14 वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केली आहे. त्याचा सातबारा ही उपलब्ध आहे. वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याची माहिती एक्स व्दारे आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी प्रसारित केली होती. ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबीयांनी तसा बोर्ड लावला आहे. दीड कोटी या जमिनीची किंमत असल्याचे सांगितले जात आहे.
What's Your Reaction?