शहा बंधूंनीही जपला विचारांचा वारसा 'कर्मयोगींना' केलं अभिवादन
आय मिरर
इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी खासदार स्व.कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील ऊर्फ भाऊ यांच्या अठराव्या पुण्यस्मरणा निमित्त आज शुक्रवारी दि.13 सप्टेंबर रोजी तालुकाभरातून विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले. यात इंदापूरच्या राजकारणात महत्वपूर्ण स्थान असलेल्या शहा बंधूंनी ही भाऊंच्या विचाराचा वारसा जपत इंदापूर शहरातील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणातील श्रद्धेय भाऊंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेत आपल्या मित्र परिवारासोबत त्यांना पुष्प अर्पण करीत अभिवादन केले.
यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,माजी संचालक मुकुंद शहा,बापू जामदार, प्रमोद शहा,अरविंद गारटकर, सुनिल तळेकर,पोपट पवार,गणेश महाजन, आरशद सय्यद,निवास माने,अशोक चव्हाण,अमोल माने आदी उपस्थित होते.
इंदापूरचे नगरशेठ स्वर्गीय गोकुळशेठ शहा यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून इंदापूर तालुक्याच्या जडणघडनेत महत्वपूर्ण योगदान दिले.त्यांचा वारसा मुकंद शहा भरत शहा अंकिता शहा व शहा कुटुंबिय पुढे चालवित आहेत.कर्मयोगी साखर कारखाना उभारणीत ही गोकुळशेठ यांचा सिंहाचा वाटा होता, कर्मयोगींचा त्यांवर विश्वास ही मोठा असल्याने स्थापनेपासूनचं उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर होती.
1952 पासून ते 2006 पर्यंत स्व.शंकररावजी पाटील ऊर्फ भाऊ यांनी आपलं पूर्ण आयुष्य इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी व्यथित केल्याने जनतेने त्यांनी कर्मयोगी पदवी बहाल केली.त्यामुळे कर्मयोगींच्या विचारांचा वारसा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
What's Your Reaction?