उजनीतून भीमा नदी पात्रात 50 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग

Aug 25, 2024 - 09:24
 0  283
उजनीतून भीमा नदी पात्रात 50 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग

आय मिरर

उजनी धरणा मधून भीमा नदीपत्रात सुरु असणारा विसर्ग शनिवारी रात्री आठ वाजता वाढवून तो 50 हजार क्युसेक्स इतका करण्यात आला. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावातील लोकांना उजनी धरण प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संततधार पावसामुळे उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होत असल्याने उजनीतून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. 

आज रविवारी सकाळच्या 9 च्या प्राप्त आकडेवारी नुसार दौंड बंधा-यातून उजनी धरणात 22780 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग येत असून उजनीतून भीमा पात्रात 50 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे. उजनी धरण सध्या 102 टक्के भरलेले असून उजनीत 118 टीएमसी पाणीसाठा आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow