भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पक्ष बदलाच्या वाटेवर ? पवारांसोबत नेमकी काय चार्चा ?

Aug 27, 2024 - 14:41
Aug 27, 2024 - 14:59
 0  760
भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पक्ष बदलाच्या वाटेवर ? पवारांसोबत नेमकी काय चार्चा ?

आय मिरर

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते हे शरद पवार आज पुण्यात आहेत.शरद पवार यांची वसंत दादा शुगर इन्स्टिट्युट मध्ये बैठक होती.या बैठकीला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील देखील उपस्थित होते.वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मधील बैठक संपल्यानंतर आता या शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या चर्चा सुरू आहेत.शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या बंद दाराआड चर्चा झाली असून नेमकी काय चर्चा झाली हे पुढे आले नाही. त्यामुळे भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पक्ष बदलाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर आज दोघे चर्चा करत आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलं आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow