“निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप केले जातात” : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोधकांवर हल्ला

Nov 9, 2025 - 17:25
Nov 9, 2025 - 17:26
 0  243
“निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप केले जातात” : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोधकांवर हल्ला

पार्थ पवार यांच्या कंपनीवर झालेल्या जमीन व्यवहाराच्या आरोपांवर अजित पवार यांची प्रतिक्रिया — “एक रुपयाचा व्यवहार न होता नुसता आकडा लिहून कागद तयार झाला, ही आश्चर्याची बाब”

बारामती : आय मिरर 

राज्यात निवडणुका सुरू होताच आमच्यावर आरोप केले जातात.पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरण आणि त्यात पार्थ पवार यांच्या कंपनीचं नाव आल्याने विरोधकांनी हल्लाबोल केला असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना धारेवर धरलं आहे. तर एक रुपयाचा व्यवहार न करता जमीन व्यवहाराची नोंदणी कशी होते असे म्हणत अजित पवार यांनी नोंदणी अधिकाऱ्यालाच आरोपीच्या पिंजाऱ्यात उभ केले आहे.

याबाबत बारामतीत पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की,“मधल्या काळात काही घटना घडल्या. त्याबद्दल मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्या संदर्भात एफआयआर दाखल झाला असून चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी एक महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

एक रुपयाचा व्यवहार न होता नुसते आकडे लिहून कसा काय कागद तयार होऊ शकतो? हे मला आजवर समजलेलं नाही. त्यामुळे मीही या प्रकाराने आश्चर्यचकित आहे.” असं म्हणत अजित पवार यांनी निबंधकांना आरोपीच्या पिंजाऱ्यात उभ केले आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप होतात. कोठून तरी काहीतरी मुद्दाम काढलं जातं. 2009 साली 70 हजार कोटींचा आरोप झाला होता, पण पंधरा-सोळा वर्षांनंतर ही त्याचं काही निष्पन्न झालं नाही. तरी आमची बदनामी होते. कोणीही काहीही बोलतं आणि काही माध्यमं त्याच बरोबर पक्षाचे प्रवक्ते त्या आरोपांमध्ये भर घालतात.”

 

 “जर खरंच चुकीचं काही घडलं असेल, तर चौकशी झाली पाहिजे. पण फक्त अफवा पसरवून राजकीय फायदा घेणं योग्य नाही. आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत जनतेसाठी काम करतो, तेही कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहून.”

बारामती मधील मेढद येथील जमीन गट क्रमांक 414/1 संदर्भात बोलताना ते म्हणाले, “त्या प्रकरणातले सर्व कागदपत्र तपासावेत. चुकीचं काही झालं असेल, तर संबंधितांवर कारवाई करावी. पण नुसते आरोप करून वातावरण दूषित करू नका. या व्यवहाराला नऊ वर्ष झाली आहेत, आजपर्यंत कुठलाही ठोस पुरावा कुणाकडे नाही.”

अधिकाऱ्यांना आवाहन करताना पवार म्हणाले, “मी नेहमी सांगतो — कोणत्याही दबावाला बळी पडू नका. माझे नातेवाईक, कार्यकर्ते, अधिकारी कोणीही असतील, नियमात न बसणारे काम करू नका. क्लास वन, क्लास टू, आयएएस, आयपीएस सर्वांनी कायदयात बसत नसेल तर कोणाचही काम करू नये ”

बारामतीच्या निवडणुकीत गुरुवार पासून उमेदवारी अर्ज भरणार...

बारामती नगरपरिषद या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की बारामती नगरपरिषद ही यापूर्वी आघाडीच्या माध्यमातून लढवली जायची दोन आघाड्या निवडून निवडणूक लढवायच्या आणि जो निवडून येईल तो शरद पवार यांचा असायचा मात्र मी खासदार झाल्यानंतर पक्ष च्या माध्यमातून निवडणूक लढण्यास सुरुवात केली यावेळेस सोमवारपासून निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे मात्र जे माझ्या विचारांचे उमेदवार आहेत ते गुरुवार नंतरच उमेदवारी अर्ज भरतील.

गुरुवारी बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीच्या संभाव्य उमेदवारांची मुलाखत होईल त्यानंतर बारामतीत कार्यकर्त्यांचा मेळावा होईल आणि नंतरच उमेदवारी अर्ज भरले जातील आजपर्यंत मी केलेली काम आणि पुढील पाच वर्षात करण्यात येणार असलेल्या कामांची संधी पाहून लोक आम्हाला प्राधान्य देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

जय पवार नगरध्यक्ष पदाचे उमेदवार नाहीत...

बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून नगराध्यक्ष पदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. अखेर या चर्चांवर अजित पवार यांनी पडदा टाकला आहे. माझ्या कानावर ही चर्चा आली मात्र नगराध्यक्ष पदासाठी जे पवार उमेदवार नाहीत असे स्पष्टपणे अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण असणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

राज्यातील युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील...

राज्यामध्ये होणारी ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सर्वांनी एकत्रितपणे लढवावी अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली त्याचबरोबर ही निवडणूक होत असताना याबाबतचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनील तटकरे आणि त्यांनी नेऊन दिलेली नेतेमंडळी येथील त्याचबरोबर ज्या ठिकाणी एखाद्या पक्षाचा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी अशी अपेक्षा देखील अजित पवार यांनी व्यक्त केली.

ज्या ठिकाणी मताचे विभाजन होऊन तोटा होईल असे वाटते त्या ठिकाणी एकत्र लढणार...

या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी मत विभाजन होऊन तोटा होईल असे वाटत असेल अशा ठिकाणी एकत्र लढणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं मात्र त्या ठिकाणी सर्वांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी असे देखील त्यांनी म्हटले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow