ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Jul 3, 2026 - 07:44
Jul 3, 2026 - 07:53
 0  444
ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

आय मिरर (निलेश मोरे)

दौंड तालुक्यातील खडकी येथील तुकाईनगर परिसरात ट्रॅक्टरला जोडलेल्या औषध फवारणी यंत्रात साडी अडकून ४० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मीनाबाई हरी काळे असे मृत महिलेचे नाव आहे.

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्राच्या टाकीमध्ये किती औषध शिल्लक आहे, हे पाहण्यास मीनाबाई काळे गेल्या होत्या. त्या यंत्राजवळ उभे राहून टाकीतील औषधाची पातळी पाहत असताना त्यांच्या साडीचा पदर ट्रॅक्टर व फवारणी यंत्राला जोडलेल्या फिरत्या शॉफ्टमध्ये अडकला यावेळी ही दुर्घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी येथील कल्पेश सुरेश ओस्तवाल यांच्या शेतात औषध फवारणीचे काम सुरू होते. ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्राच्या टाकीमध्ये किती औषध शिल्लक आहे, हे पाहण्यास मीनाबाई काळे गेल्या होत्या.

त्या यंत्राजवळ उभे राहून टाकीतील औषधाची पातळी पाहत असताना त्यांच्या साडीचा पदर ट्रॅक्टर व फवारणी यंत्राला जोडलेल्या फिरत्या शॉफ्टमध्ये अडकला. यावेळी ही दुर्घटना घडली.

यंत्र सुरू असल्याने त्या क्षणार्धात फिरत्या शाफ्टमध्ये ओढल्या गेल्या. या भीषण अपघातात त्यांच्या शरीराचे गंभीर तुकडे होऊन घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

या प्रकरणी राकेश दत्तात्रय काळे (रा. खडकी गुणवरेवस्ती, ता. दौंड) यांनी खबर दिली असून भिगवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow