Dound खुटबाव दुहेरी खून प्रकरणात आरोपीला जन्मठेप, बारामती न्यायालयाचा निकाल !
आय मिरर
दौंड तालुक्यातील खुटबाव येथे 2020 मध्ये घडलेल्या दुहेरी खून प्रकरणात बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पत्नी आणि तिच्या सहकाऱ्याची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार उर्फ मंगेश अरुण जाधव याला न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेप आणि पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षाने सादर केलेले भक्कम पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला असून, या खटल्यात यवत पोलिसांच्या तपासाचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
आरोपी प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार उर्फ मंगेश अरुण जाधव राहणार सद्गुरु कॉलनी वेणूनगर वाकड रोड हवेली याने 31 जुलै 2020 रोजी लोखंडे कोयता आणि लाकडी काठीने जीव घेणा हल्ला केला होता. यामध्ये त्याची पत्नी मनीषा उर्फ आणि बाई उर्फ अशी बाई मंगेश जाधव आणि भोर येथील गुलचंद निकम यांचा निघृण खून झाला होता. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यवत पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी खोलवर तपास करत आरोपी विरुद्ध भक्कम आणि सबळ पुरावे जमा केले आणि तपास पूर्ण होताच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर बारामती अप्पर व जिल्हा सत्र न्यायालयात हा खटला जवळपास पाच वर्षे चालला याचा निकाल गुरुवारी दोन जुलै 2026 रोजी जाहीर झाला.
या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फी एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये आठव्या क्रमांकाचा साक्षीदार असलेली बालाबाई जाधव या महिलेने दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील सुनील ईश्वर वसेकर यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलवान्वये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
What's Your Reaction?