मोकात चार वर्षापासून फरार, बारामती एमआयडीसीत आला पोलिसांना टीप लागली अन्...
आय मिरर
गेल्या चार वर्षापासून मोका गुन्ह्यात थरार असलेल्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी गजाआड केल आहे.सोनू उर्फ ओंकार संजय जाधव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो इंदापूर तालुक्यातील कळंब गावचा रहिवासी आहे. बारामती तालुका पोलिसांनी त्याला एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतलं आहे.
सोनू उर्फ ओंकार संजय जाधव हा गेल्या चार वर्षांपासून मोका गुन्ह्यात फरार होता.पोलिस त्याचा वारंवार शोध घेत होते.मात्र तो चकवा देत होता. बारामती तालुका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात 563/2022 भा.द वि कलम 307, 120(ब ), 201, 143 सह आर्म ऍक्ट कलम 2,25 नुसार गुन्हा दाखल होता.
सोनू उर्फ ओंकार संजय जाधव हा पोलीस ठाणे हद्दीत एम आय डी सी परिसरात येणार असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी एम आय डी सी परिसरात पेट्रोलिंग करत असताना सोनू उर्फ ओंकार संजय जाधव यास अटक केली आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड,बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली ग्रेड पो उप निरीक्षक कल्याण शिंगाडे, स.फौ.सुरेंद्र वाघ, पो.हवा.खारतोडे, पो.हवा.अभिजीत एकशिंगे, पो.हवा.आप्पा दराडे, पो.शि.निलेश वाकळे,पो.शि.मनोज पवार यांनी पार पाडली.
What's Your Reaction?