इंदापुरात भरदिवसा विरोधी पक्ष नेत्यावर जीवघेणा हल्ला ; अनिल पवार थोडक्यात बचावले
आय मिरर
पुण्याच्या इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल पवार यांच्यावर दिवसाढवळ्या नगरपरिषद कार्यालयाबाहेर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यातून अनिल पवार थोडक्यात बचावले आहेत.
नगरपरिषदेतील बैठक संपवून बाहेर येत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी अचानक धाव घेत चॉपर आणि चाकूने हा हल्ला करण्यात आला आहे.
या हल्ल्यात अनिल पवार यांच्या डाव्या हातावर वार झाला असून प्रसंगावधान राखल्यामुळे ते मोठ्या अनर्थातून बचावले.
दरम्यान, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, भाजपचे नेते प्रवीण माने यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी विरोधी पक्षनेते अनिल पवार यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी पवार म्हणाले, "मी या हल्ल्यातून वाचलो असून, पोलीस प्रशासन संबंधित हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे."
अनिल पवार यांच्यावर हल्ला होताच त्यांना वाचवण्यासाठी धावून गेलेले वसीम शेख हेही या घटनेत जखमी झाले आहेत.सध्या अनिल पवार आणि वसीम शेख यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून या घटनेतील हल्लेखोर कोण आहेत आणि त्यांनी हा हल्ला कोणत्या कारणातून केला याचे नेमके कारण काय याचा पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?