संजय गांधी निराधार योजनेचे पैसे थकले, इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आंदोलन

Feb 25, 2025 - 13:56
 0  596
संजय गांधी निराधार योजनेचे पैसे थकले, इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आंदोलन

आय मिरर

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे गेल्या दोन महिन्यापासूनचे अनुदान लाभार्थ्यांना अद्याप मिळाले नसल्याने पुण्याच्या इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रशासकीय भवन कार्यालयात आंदोलन करण्यात आलय.

रखडलेल अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात याव शिवाय प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला हे अनुदान लाभार्थ्यांना मिळाव अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ,सामाजिक न्याय तालुका कार्याध्यक्ष विकास खिलारे,इंदापूर शहर कार्याध्यक्ष संजय शिंदे,बारामती लोकसभा कार्याध्यक्ष अक्षय कोकाटे,इंदापूर शहर युवक अध्यक्ष श्रीकांत मखरे,महिला शहर उपाध्यक्ष तमन्ना शेख, महिला शहर कार्याध्यक्ष रुपाली रणदिवे,तालुका उपाध्यक्ष संजय शिंगाडे,सामाजिक न्याय तालुका उपाध्यक्ष विकास चितारे,सामाजिक न्याय शहर अध्यक्ष अजय पारसे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य व केंद्र सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या योजनांचे गेल्या दोन महिन्यापासून अनुदान लाभार्थ्यांना मिळालेले नाही. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग वेतन वेतन योजना या योजनांचे डिसेंबर आणि जानेवारी अनुदानाचे पैसे अद्याप थकीत आहेत ते तात्काळ मिळावे.यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर प्रशासकीय कार्यालयात सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला या योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow