BIG NEWS राजकिय विरोधक असणारे दोन पवार आले एकत्र , वाचा सविस्तर
आय मिरर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव युवा नेते जय पवार आणि पुतणे युगेंद्र पवार हे काल शनिवारी दि.31 आँगस्ट रोजी बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील यात्रेनिमित्त आयोजित कुस्तीच्या मैदानात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, जय पवार यांच्याकडून या मैदानाला मानाची गदा प्रदान करण्यात आली.
कन्हेरी गावच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचं मैदान भरवण्यात आलं होतं. याप्रसंगी जय पवार यांना खांद्यावर घेत येथील आयोजकांकडून मैदानाला फेरी मारण्यात आली. दरम्यान, या मैदानानिमित्त जय पवार आणि युगेंद्र पवार हे समोरासमोर आले. त्यावेळी दोघांनी एकमेकांची गळाभेटही घेतली.
बारामती विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसापासून पुढे येत आहे. तर दुसरीकडे मध्यंतरी बारामती विधानसभेतून अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनाही उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी ही पुढे आली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी सात-आठ वेळा बारामतीचे नेतृत्व केला आहे मला रस नाही त्यामुळे युवकांची मागणी असेल तर त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे संसदीय समिती त्याचा निर्णय घेईल. स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू. आता हे दोन्ही परस्पर विरोधक असणारे युवा नेते एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
What's Your Reaction?