आ.भरणेंच्या नेतृत्वात इंदापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाचे वर्चस्व,तालुकाध्यक्ष कोकाटेंचा दावा

Nov 6, 2023 - 15:05
 0  1854
आ.भरणेंच्या नेतृत्वात इंदापूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाचे वर्चस्व,तालुकाध्यक्ष कोकाटेंचा दावा

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील नुकत्याच झालेल्या सहा ग्रामपंचायत व पोटनिवडणुकीत अजित पवार गटाचे वर्चस्व सिद्ध झाले असून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली पाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दावा केला आहे.

यावेळी बोलताना हनुमंत कोकाटे म्हणाले आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे. यातून आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेले काम दिसून आले आहे.बावडा ग्रामपंचायत मध्ये निसटता पराभव झाला त्या ठिकाणीही पुढील काळात दुरुस्ती करण्यात येईल.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष सचिन खाम, जिल्हा सरचिटणीस प्रफुल पवार, उपसरपंच सागर व्यवहारे उपस्थित होते

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow