BIG BREAKING निरा मोरगांव रस्त्यावर भरधाव टेम्पोने 16 वर्षीय मुलाला चिरडले

Aug 31, 2024 - 18:42
 0  419
BIG BREAKING निरा मोरगांव रस्त्यावर भरधाव टेम्पोने 16 वर्षीय मुलाला चिरडले

आय मिरर

निरा-मोरगाव रस्त्यावर जगतापवस्ती येथे निरा डाव्या कालव्याच्या वळणावर आयशर टेम्पोने एका 16 वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना घडलीय.यामध्ये या मुलाचा जागीच मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यू नंतर संतप्त जमावाने टेम्पो पेटवून दिलाय. या अपघातात नीरा येथील पोकळे वस्तीत राहणारा 16 वर्षीय इजाज खुर्शीद सय्यद याचा मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर संतप्त जमावाने हा आयशर टेम्पो पेटवून दिला आहे. त्यामुळे काही काळासाठी या भागातील वातावरण तणावपूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान वडगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जमाव शांत केला.तर नीरा येथील ज्युबिलंट अग्निशमन दलाने ही आग विजवली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow