राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी मोठी अपडेट ! हल्ला करण्यासाठी दिली होती दोन लाखांची सुपारी ; वाचा सविस्तर

Oct 20, 2026 - 22:25
Oct 20, 2026 - 22:30
 0  778
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी मोठी अपडेट ! हल्ला करण्यासाठी दिली होती दोन लाखांची सुपारी ; वाचा सविस्तर

आय मिरर 

राणा शिपिंग कार्पोरेशनचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळ परिसरात सशस्त्र हल्ला झाला होता.या हल्ल्याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. 

मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वीट येथील रहिवाशी असणारा आणि सध्या इंदापूर तालुक्यातील भिगवण मधील थोरातनगर मध्ये वास्तव्यास असणाऱ्या ज्ञानदेव महादेव शिंदे याने राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. बारामती तालुका पोलिसांनी ज्ञानदेव शिंदे याला अटक केली आहे.

हा हल्ला झाल्यानंतर हा हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची जवळपास सहा ते पथके तैनात करण्यात आली होती. पुणे शहर पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी पार्थ वासुदेव अवथळे यासह एक विधी संघर्ष ग्रस्त बालक या दोन संशयतांना पुण्यातील कर्वेनगर मधून ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पुढील तपास कामी बारामती तालुका पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.

पोलिसांनी विधी संघर्षग्रस्त बालक व पार्थ वासुदेव अवथळे यांचेकडे विचारपूस केली असता या दोघांना ज्ञानदेव महादेव शिंदे वय ५० वर्षे याने हा हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. 

ज्ञानदेव शिंदे हा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वीट गावचा रहिवासी असून सध्या तो पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण मधील थोरातनगर मध्ये वास्तव्यास आहे. पोलिसांनी ज्ञानदेव शिंदे याला देखील आता अटक केली आहे.बारामती न्यायालयांने पार्थ वासुदेव अवथळे आणि ज्ञानदेव महादेव शिंदे यांना 23 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow