मोठी बातमी ! भिगवण प्रकरणात अझर शेखला पोलिसांकडून अटक

Apr 22, 2026 - 19:04
Apr 22, 2026 - 19:09
 0  1460
मोठी बातमी ! भिगवण प्रकरणात अझर शेखला पोलिसांकडून अटक

आय मिरर 

पुण्याच्या इंदापूर मधील भिगवण मधील कथित अपहरण प्रकरणात अझर शेखला भिगवण पोलिसांनी आज अटक केली आहे.भिगवण पोलिसांनी अझर शेख ला भिगवण तरुणी अपहरण व अत्याचार प्रकरणात आज अटक केली आहे.आज त्याला इंदापूर सत्र न्यायालयात यू एम मुधोळकर जिल्हा अतिसत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात हजर केले.

न्यायालयाने 27 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील एडवोकेट प्रसन्न जोशी यांनी दिली आहे.

यापूर्वीच अझर शेख ला दौंड पोलिसांनी 27 फेब्रुवारी रोजी दौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटक केली होती.आता पुन्हा भिगवण पोलिसांनी अझर शेख याला भिगवण प्रकरणात अटक केली आहे.

17 फेब्रुवारी रोजी भिगवण मध्ये एका मुलीचं अपहरण झालं होतं.मात्र हे अपहरण प्रेम संबंधातून झाल्याचं तपासात पुढे आलं. 18 फेब्रुवारी रोजी भिगवण मध्ये आमदार गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला होता संपूर्ण महाराष्ट्रात हा विषय गाजला होता. 

यावेळी या प्रकरणात अझर शेख याला आरोपी करून त्याला अटक करावी त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पुढे आली होती.आज अखेर भिगवण पोलिसांनी सापळा रचून अझर शेख याला बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित तरुणीने या प्रकरणात वारंवार आपले जबाब फिरवले असून 4 एप्रिल रोजी संबंधित तरुणीने भिगवण पोलिसांसमोर आपला पुरवणी जबाब दिला आहे. या जबाबात अझर शेख याच्यावर पीडित तरुणीने आरोप केले आहेत. यातील मुख्य आरोपीकडून आपल्यावर अत्याचार करण्यात आला त्यावेळी यातील मुख्य आरोपीला अझर शेख याने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप आहे. 

यातील मुख्य आरोपी सध्या फरार आहे तर अझर शेख याला भिगवण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारात एकूण चार आरोपी असून यातील एकाला अटक केली आहे तर तीन जण फरार आहेत. 

काय आहे प्रकरण...

भिगवण मध्ये 17 फेब्रुवारी 2026 रोजी एका तरुणीचे अपहरण झाले होते.भिगवण बाजारपेठेतून या तरुणीच अपहरण झालं अशी तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात 17 फेब्रुवारी रोजी दाखल झाली.आपल्या डोळ्यात मिरचीची पूड फेकत आणि आपल्याला मारहाण करत आपल्यासमोर आपल्या मुलीचं अपहरण झालं अशी फिर्याद संबंधित तरुणीच्या आईने भिगवण पोलिसात नोंदवली.

त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी भिगवण मध्ये बंद पाळण्यात आला होता.तर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भिगवण पोलीस ठाण्यावर हिंदू जनाक्रोश मोर्चा ही काढण्यात आला होता.

याच दरम्यान 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी उशिरा संबंधित मुलीचा एक व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रसारित झाला, ज्यामध्ये संबंधित तरुणीने आपलं अपहर झालं नाही तर आपण स्वेच्छेने जहीर शेख बरोबर गेलो आहोत आपले त्याच्यासोबत प्रेम संबंध आहेत असं म्हटलं होत.

त्यानंतर संबंधित तरुणी आणि यातील आरोपी जहीर शेख हे 20 फेब्रुवारी रोजी च्या मध्यरात्री बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाले होते. संबंधित तरुणीने बारामती शहर पोलिसांसमोर ही आपला जबाब कायम ठेवला. आपण स्वैच्छने आरोपी सोबत गेलो असून आपले त्याचे प्रेम संबंध आहेत असं तरुणीने म्हटलं.बारामती पोलिसांनी संबंधित तरुणीला बारामती सत्र न्यायालयासमोर हजर केल असता ती आपल्या दाव्यावरती ठाम राहिली.या दरम्यान मात्र मुलीच्या नातेवाईकांकडून आणि तिच्या आईकडून या प्रकरणात आरोप केले गेले. 

या प्रकरणातील आरोपी जहीर शेख याचा चुलता अझर शेख हा दौंड चे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि त्याच्या सांगण्यावरून हे सर्व होत आहे त्याला या प्रकरणात आरोपी करून अटक करा अशी मागणी तरुणीच्या आईने आणि नातलगांनी केली. 

याच दरम्यान अझर शेख याने आपल्या व्हाट्सअप ला एक स्टेटस ठेवला ज्यामध्ये आमदार राहुल कुल यांचा फोटो होता. ज्या फोटो वरून आणखीनच वाद चिघळला गेला होता.

मात्र या दरम्यान बारामती न्यायालयासमोर संबंधित तरुणीने आपल्याला जहीर शेख याच्याबरोबर जायचं आहे आईसोबत नातेवाईकांसोबत जायचं नाही असं म्हटल्याने न्यायालयाने संबंधित तरुणीची रवानगी पुण्यातील महिला सुधार ग्रहात केली. 

यानंतर 25 फेब्रुवारी 2026 रोजी इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी संबंधित तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी मात्र मुलीने आपला जबाब फिरवला.आपल्याला आईकडे आणि मामाकडे जायची इच्छा व्यक्त केली आहे. यावर न्यायालयाने संबंधित मुलीचा ताबा आई आणि मामाकडे देण्यासंदर्भात आदेश पारित केला आहे. यानंतर मुलीचा ताबा तिच्या नातेवाईकांकडे देण्यात आला.

या प्रारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला. संबंधित तरुणींने पुन्हा एकदा पोलिसांपुढे आपला जबाब फिरवला.पीडितेने आपल्यावरती अत्याचार झालाय असा जबाब पोलिसांना दिला.आरोपीने आपल्यावर बळजबरीने शरीर संबंध ठेवले असा पीडितेचा आरोप आहे. तरुणीने दिलेल्या जबाबदावरून चार आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अगोदरच गुन्हा दाखल होता तरुणीच्या जबाबावरून कलम वाढवण्यात आली अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी सहा एप्रिल रोजी दिली होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow