नींबूत येथील ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त

Feb 27, 2026 - 08:34
Feb 27, 2026 - 08:35
 0  120
नींबूत येथील ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त

आय मिरर 

बारामती तालुक्यातील निंबुत गावच्या ओढ्यालगत असणारा गावठी हातभट्टी दारूचा अड्डा वडगाव निंबाळकर पोलिसांनी उध्वस्त केलाय. पोलिसांनी तीन लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त करीत प्रमोद प्रकाश नवले याच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नींबूत गावच्या हद्दीत ओढ्यालगत प्रमोद प्रकाश नवले हा गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती.

त्या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, 03 नग लोखंडी बॅरल मध्ये कच्चे रसायन, जमिनीत मोठ्या खड्ड्यामध्ये कच्चे रसायन, 02 नग प्लॅस्टिकच्या टाक्या,35 लिटर क्षमतेचे हातभट्टी गावठी दारूचे 24 नग, 04 नग विद्युत मोटर पंप व इतर साहित्य असा एकूण 3 लाख 59 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,पोलीस हवालदार पोपट नाळे, अनिल खेडकर, महिला पोलीस हवालदार शुभांगी दणाने,पोलीस अंमलदार आबा जाधव,नरेंद्र यादव, धनंजय भोसले, विकास येटाळे,महिला पोलिस अंमलदार प्रियंका झणझणे, चालक पोलीस हवालदार विजय शेंडकर यांनी मिळून केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow