इंदापूरच्या भांडगांव मध्ये एका महिलेसह दोन लहान मुलांवर वार

Jun 27, 2024 - 12:29
Jun 27, 2024 - 13:21
 0  2811
इंदापूरच्या भांडगांव मध्ये एका महिलेसह दोन लहान मुलांवर वार

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील भांडगाव मध्ये एका मध्यपीने दारुच्या नशेत 30 वर्षीय महिलेवर आणि दोन लहान बाळावर सतुराने वार केलेत. इंदापूरच्या भांडगांव मध्ये ही खळबळजनक घटना घडलीय.आरोपी जेव्हा सतुराने हे वार करीत होता तेव्हा गावकऱ्यांनी हे कृत्य पाहिलं आणि या आरोपीला गावकऱ्यांनी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.सुरेश उमाजी मदणे ऊर्फ गोट्या असं आरोपीचं नांव असून इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितलं आहे.

या घटनेत तीन वर्षाची प्रियल लक्ष्मण चव्हाण ही लहान मुलगी जखमी झाली असून तीच्या मानेवर मागील बाजूस जखम झाली असून तिच्यावर सध्या अकलूज येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर सोनाली शाम जाधव ही तीस वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून तिचा दिड वर्षाचा शिवांश शाम जाधव हा लहान मुलगा देखील जखमी झाला आहे. या दोघांवर सध्या इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow