शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहारातून बारामतीच्या निंबुत मध्ये झाला गोळीबार, एकजण गंभीर
आय मिरर
बारामती तालुक्यातील निंबुत येथे एक गोळीबाराची घटना घडली आहे.यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला.या संदर्भात स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नींबुत तेथील गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला.या गोळीबारात फलटण येथील रणजीत निंबाळकर यांच्या डोक्याला गोळी लागली असून त्यांच्यावर पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळतेय.
तर याप्रकरणी वडगांव निंबाळकर पोलिसांनी गौतम काकडे,गौरव काकडे आणि इतर तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला असून यापैकी गौरव काकडे,सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांना चौकशी कामी ताब्यात घेतले आहे.
गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांचा शर्यतीचा बैल खरेदी केला होता.हा खरेदी केलेला बैल निंबाळकर हे पुन्हा मागत होते.मात्र याच्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला. रंजीत निंबाळकर हे काल मोठ्या प्रमाणात लोक घेऊन गौतम काकडे यांच्या घरी जबरदस्तीने बैल नेण्यासाठी आले होते.यावेळी त्यांचा वाद झाला आणि याच्यातूनच गोळीबार झाला.या गोळीबार मध्ये रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झालेत.
What's Your Reaction?