आ.भरणेंना रोखण्यासाठी 'माय-लेकी' मैदानात,पाटील माने भरणे यांच्यात थेट सामना

Nov 8, 2024 - 10:26
Nov 8, 2024 - 13:38
 0  3342
आ.भरणेंना रोखण्यासाठी 'माय-लेकी' मैदानात,पाटील माने भरणे यांच्यात थेट सामना

आय मिरर

इंदापूर विधानसभेत यंदा विजयाचा गुलाला कोण उधळणार यासाठी आता केवळ काही दिवसांची प्रतिक्षा आहे.२०१४ पासून आ.भरणे तालुक्याचं नेतृत्व करत आहेत.पुन्हा एकदा विजय खेचून आणण्यासाठी भरणे तयारीनिशी मैदानात उतरलेले असताना हर्षवर्धन पाटलांच्या झालेल्या दोन वेळच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी स्वत: हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील आणि मुलगी अंकिता पाटील ठाकरे रणांगणात उतरल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भाग्यश्री पाटील यांनी तळागाळात संपर्क सुरु केला असून स्वत: त्या मतदारांशी संवाद साधताना पहायला मिळाल्या.तर अंकिता पाटील ठाकरे यांनी 13 आँक्टोंबर पासून तालुक्यात जनसवांद यात्रेच्या माध्यमातून दौरा केला.

यावेळी त्यांनी थेट आमदार भरणे यांवर आरोपाच्या फैरी झाडत भरणेंपुढे आव्हाण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.साडी वाटपाच्या मुद्यावरुन ही भरणे यांना त्यांनी लक्ष केलं.

पाटील भरणे माने इंदापूरात थेट सामना……

इंदापूर विधानसभेत यंदा तिरंगी लढत होतेय.यात हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने यांच्यात थेट सामना होतोय.भरणेंना चितपट करण्यासाठी हर्षवर्धन पाटलांनी यंदा थेट शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करीत हाती तुतारी घेतलीय.तर विकासाच्या मुद्द्यावर आ.भरणे आपला विजयश्री खेचून आणण्यासाठी मैदानात उतरलेत.अशातच या दोन्ही बलाढ्य नेत्यांना युवा नेतृत्व असलेल्या प्रवीण माने यांनी ललकारलं आहे.मला एकदा संधी देऊन जनसेवक म्हणून काम करीन असे म्हणत रान पेटवले आहे.मानेंनी थेट अपक्ष उमेदवारी दाखल करीत पाटील आणि भरणेंविरोधात दंड थोपाटले आहेत.त्यामुळे इंदापूरात पाटील माने भरणेंमध्ये थेट सामना पहायला मिळेल.

आ.भरणेंवर आरोपांची सरबत्ती…

दर्जाहीन रस्ते,विकासकामे अशा मुद्द्यांना हात घातल हर्षवर्धन पाटील,अंकिता पाटील ठाकरे आणि राजवर्धन पाटील यांनी आमदार भरणेंना लक्ष केलं आहे.दत्तात्रय भरणेंनी गेल्या दहा वर्षात केवळ स्वत:चाच विकास केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय.मलिदा गँग म्हणून त्यांवर ताशेरे ओढले जात आहे.५ टीएमसी पाण्याची योजना मंजूर झाल्याचा जीआर दाखवा असं आव्हाण पाटलांनी भरणेंना दिलयं.

आ.दत्तात्रय भरणेंनी आरोप खोडले…

मी विकास केला आहे की मलिदा खाल्ला हे सामान्य जनतेला माहित आहे.माझा जन्मचं बंगल्यात झाला आहे.तालुक्यात मलिदा कोणी खाल्ला हे जनतेला सांगायची गरज नाही असं प्रतित्युत्तर देत विजयाचा गुलाल मीच उधळणार असा दावा आ.दत्तात्रय भरणेंनी केला आहे.

हर्षवर्धन पाटलांना घरातूनचं आव्हाण…

ऐन निवडणूकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांना त्यांचे सख्खे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी घरातूनचं आव्हाण दिलेय.मयूरसिंह पाटील यांनी अपक्ष उमेदवार प्रविण माने यांना आपला पाठींबा दर्शवला आहे.राजकीय आखाड्यात गेल्या दोन दिवसापासून याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आ.भरणेंसाठी आप्पासाहेब जगदाळे मैदानात…

हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्याने विरोधात भुमिका घेतलेले जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळेंनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटात प्रवेश केला आहे. जगदाळे आ.भरणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असल्याने आता अधिकचं वातावरण तापणार आहे.जगदाळेंसोबत इतर काही नेत्यांनी पाटलांची साथ सोडली पण नेत्यांसोबत मतदार गेला का याचं उत्तर मात्र २३ तारखेच्या निकालातून पहायला मिळेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow