भिगवण नजीक भुसा वाहतुक करणारी ट्राॅली पलटली,ट्राॅलीचे चाक निखळल्याने झाला अपघात
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील भिगवण नजीक पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्हावर भुसा वाहतुक करणारी ट्राॅली पलटी होऊन महामार्गावर भुसा विस्कटला गेलाय. भिगवण नजीक शेख वस्ती समोर हा अपघात घडला आहे.अचानक या ट्राॅलीचे चाक निखळल्याने हा अपघात झाल्याची माहीती महामार्ग पोलिसांनी दिलीय. एन एच ए आय चे जवान आणि इंदापूर पोलीस मदत केंद्राचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त ट्राॅली आणि भुसा बाजूला करण्याचे काम सध्या सुरु आहे.
पुणे बाजूकडून सोलापूरच्या दिशेने ट्रॅक्टर ट्राॅली मध्ये भुसा(बगॅस) भरुन चालवला होता. इंदापूर तालुक्यातील भिगवण नजीक अचानक ट्राॅलीचे एक चाक निखळले गेले आणि भुशाने भरलेली ट्राॅली पलटी झाली. ट्राॅलीतील भुसा महामार्गावर विस्कटला गेला.सुदैवाने यात कोणतिही जिवितहानी झाली नाही.
अपघातस्थळी इंदापूर पोलीस मदत केंद्राचे ए.एस.आय शिंदे,पोलीस हवालदार उमेश लोणकर,पो.नाईक नितीन वाघ,पो.काँ.तानाजी लोंढे यांसह एन एच ए आयचे दादा हाके,अमर आडेकर आदी दाखल झाले असून अपघातग्रस्त ट्राॅली व भुसा बाजूला करण्याचे काम सुरु आहे.
What's Your Reaction?