इंदापुरातील श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 600 उमेदवारी अर्ज दाखल...

Apr 16, 2025 - 08:01
 0  746
इंदापुरातील श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 600 उमेदवारी अर्ज दाखल...

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून काल मंगळवारी 16 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. 21 जागांसाठी तब्बल 600 अर्ज दाखल झाले आहेत.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय शेतकरी मेळावा देखील घेण्यात आला होता.

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे देखील एकत्र आले आहेत.मात्र 21 जागांसाठी सहाशे अर्ज आल्याने छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मतदान होणार की निवडणूक बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना सध्या हा आर्थिक संकटातून जात आहे आणि त्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करावी किंवा एकतर्फी करावी आणि याचे नेतृत्व पुढील पाच वर्ष महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी करावा अशी भूमिका अजित पवार यांनी कृती समितीच्या आढावा बैठकीत मांडली होती. 

परंतु छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुती मधील भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक आम्ही लढवणारच अशी भूमिका भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार आणि जर निवडणूक लागली तर टोकाचा संघर्ष होणार की एकतर्फी निवडणूक पाहायला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow