कांदलगावात मतदार नोंदणीला वेग
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील कांदलगावात दि.१ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत ग्रामपंचायतीच्या वतीने मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे,अशी माहिती ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी दिली.या अभियानाला नवीन मतदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
कांदलगाव हे उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुक्याच्या राजकीय दृष्टीकोनातून महत्वाचे गाव मानले जाते.या गावात विधानसभा आणि लोकसभेच्या मतदानाकरिता दोन भाग येतात.भाग १०३ व १०४
कांदलगाव भाग-१०३ पुरुष ४७९ स्री- ४२० एकुण मतदार - ८९९ तर भाग- १०४ मध्ये पुरुष-३४८, स्री -३०६ एकुण मतदार - ६५४
सोमवारी एकुण - 14 नविन मतदार नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम पाहणारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी पांडुरंग इंगळे यांनी दिली.गावात एकूण दोन बीएलओ असून नवीन मतदार नोंदणी,मयत नावे कमी करणे,नावातील दुरूस्ती अशी कामे या अभियानात करण्यात येणार आहेत.
साऊ-जिजाऊ ग्रामसंघाच्या वतीने देखील महिला मतदार नोंदणी व्हावी यासाठी गावात प्रबोधन होत आहे,यावेळी गावसमन्वयक निलोफर पठाण,ग्रामसंघ अध्यक्षा लक्ष्मी कसबे याही उपस्थित होत्या.गावातील अठरा वर्षावरील सर्व स्त्री-पुरूषांनी मतदार नोंदणी करून घेऊन लोकशाहीचा भाग झाले पाहिजे,अशी प्रतिक्रिया ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?