बिग ब्रेकिंग | भिगवण नजीक मदनवाडी घाटात इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकर व ट्रॅक्टरचा अपघात,टँकर चालकाचा जागीच मृत्यू 

Feb 12, 2024 - 17:48
Feb 12, 2024 - 20:39
 0  1881
बिग ब्रेकिंग | भिगवण नजीक मदनवाडी घाटात इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकर व ट्रॅक्टरचा अपघात,टँकर चालकाचा जागीच मृत्यू 

आय मिरर(देवा राखुंडे)

बारामती भिगवण मार्गावरती इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकरचा आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा मोठा अपघात झाला आहे.या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर ट्रॅक्टर चालकाचे पाय मोडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातग्रस्त टँकर मधून इथेनॉल ची गळती देखील सुरू आहे. घटनास्थळी इंदापूर पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी आणि भिगवण पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले असून सोमवारी 12 फेब्रुवारी रोजी चारच्या सुमारास मदनवाडी घाटात हा अपघात घडला आहे. घटनास्थळी बारामती ॲग्रो कारखान्याची अग्निशामक यंत्रणा देखील दाखल झाली आहे.

एका खाजगी साखर कारखान्यावरून इथेनॉल भरून हा टँकर निघाला होता, दरम्यान बारामती भिगवण मार्गावरील मदनवाडी घाटात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि इथेनॉल वाहतूक करणाऱ्या टँकरमध्ये अपघात झाला. यात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत कदम, संतोष काळे, पोलीस हवालदार उमेश लोणकर, पोलीस नाईक नितीन वाघ यांसह भिगवन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वारगड, पोलीस कॉन्स्टेबल करचे यांसह त्यांचे सहकारी दाखल झाले असून अपघात ग्रस्त इथेनॉलचा टँकर उभा करण्याचं काम सुरू आहे.तर जखमीला देखील नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow