मदनवाडी हद्दीतील जावलसिध्दनाथ मंदिरमधून 70 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी

आय मिरर(निलेश मोरे)
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या विरवाडी नंबर 2 मधील जावलसिध्दनाथ मंदिर मधून अज्ञात चोरट्याने रविवारी(दि.6)रोजी देवाचा नवस फेडायचा आहे अशी खोटावणी बतावणी करून मंदिरात प्रवेश करून देवाच्या अंगावरील 70 हजार रुपयाचे दागिने चोरीस गेल्याचा प्रकार घडला आहे.
याची फिर्याद अभिमन्यु पर्वती बंडगर (वय 51 वर्षे धंदा शेती रा. विरवाडी नं 2 मदनवाडी ता. इंदापुर जि.पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत भिगवण पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिमन्यू बंडगर यांच्या मालकिचे "श्री. जावलसिध्दनाथ मंदिर" मध्ये रविवारी(दि.6) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास 55 वर्षे वयाचा अंगात लाल शर्ट व काळया रंगाची पॅन्ट घातलेला अज्ञात इसमाने "मला देवाला नवस बोलायचा आहे, मला चावी दया, असे म्हणून फिर्यादी अभिमन्यू बंडगर यांच्या आईचा विश्वास संपादन करून मंदीराची चावी फिर्यादीचे आई कडुन घेवुन "श्री. जावलसिध्दनाथ मंदिरातील देवाच्या अंगावरील वरील 20,000/-रूपये किंमतीची चांदीचा छत्री अंदाजे वजन 350 ग्रॅम 2) 5,000/-रूपये किंमतीची चांदीची चिलीम 10 ग्रॅम,3)10ग्रॅम वजनाची 5,000/-रूपये किंमतीची देवाच्या गळयातील चांदीची चैन,4)देवाच्या गळ्यातील सोन्याचे 6 मनी व डोरले वजन 5 ग्रॅम 30,000/-रूपये किंमतीच,5) 10,000/-रोख रक्कम देवाच्या झोळीत असलेली असा एकुण किंमत 70,000/-रुपये किंमतीचे दागिने विश्वासघात करून घेवुन गेला आहे.
सदर अज्ञात इसमाविरुध्द भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार शैलेश हंडाळ करीत आहे
What's Your Reaction?






