कर्मयोगी भाऊंचे नाव इंदापूर तालुका आजही आदराने घेतो : आमदार दत्तात्रय भरणे
आय मिरर
चांगले काम केल्यास नागरिकांच्या अडचणी ओळखून सहकार्य केल्यास त्यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त होते. शाब्बासकीची थाप देऊन समाज त्याची नोंद घेत असतो हे खर्या आर्थाने आयुष्यातील समाधान असते. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी देखील इंदापूर तालुक्यामध्ये काम केल्याने तालुका त्यांचे आजही आदराने नाव घेतो. इंदापूर तालुका कधीही चांगल्या माणसाला विसरत नाही हेच यातून दिसून येते. आपणही असेच काम करून भविष्यात आपले ही असेच पुढे कोणीतरी आदराने नाव घ्यावे याच भावनेतून काम करत असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
इंदापूरात जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालयाच्या वरिष्ठ स्तरास उच्च न्यायालय व शासनाने मान्यता दिली आहे.या ऐतिहासिक निर्णयाबद्दल इंदापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणेंचा पेढा भरवून सन्मान करण्यात आला त्यावेळी आमदार दत्तात्रय धरणे बोलत होते.
इंदापूर तालुका बारासोसिएशनचे अध्यक्ष ऍड. गिरीश शहा यांनी यावेळी पक्षकार वकिलांना प्रतीक्षा कक्षासाठी शेडची स्थापना करण्यासाठी निधीची मागणी केली त्याचबरोबर वकील व पक्षकारांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्याने मोठी अडचण येत आहे त्यासाठी देखील जागा उपलब्ध करून देऊन तो प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावेळी केली. आमदार दत्तात्रय भरणे यांनी देखील यासाठी लागलीच पाठपुरावा करून सीड साठी 75 लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली त्याची मंजुरी देखील याच आठवड्यात घेणार असल्याचे सांगितले पार्किंगबाबत देखील पाठपुरावा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲड. सतिश देशपांडे म्हणाले,२००६ पासून याचा पाठपुरावा सुरु होता.२०२४ ला याला अंतिम यश मिळले आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले.सर्वांच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या ऊर्जेतून हे काम झाले. या सर्व गोष्टींच आमदार भरणे यांनी सारथ्य केलं.जे ध्यानी मनी नाही ती गोष्ट सहज झाली. न्यायव्यवस्थेच्या दृष्टीकोणासाठी मिळालेली मंजूरी महत्वाची आहे. अँड. एन. जी. शहा म्हणाले,आ.भरणे यांच्या माध्यमातून सोळा कोटी रुपयाची इमारत मंजूर करुन दिली. तुम्ही कार्यसम्राट आमदार आहात.
यावेळी अँड. लक्ष्मण शिंगाडे अँड. अँड. मनोहर चौधरी, प्रकाश वाघमोडे, अँड. अशोक कोठारी, अँड.सचिन राऊत, अँड.सतिश देशपांडे, अँड. रेशमा गार्डे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अँड. कृष्णाजी यादव यांनी केले. आभार अँड. योगेश देवकर यांनी मानले. यावेळी बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?