भिगवण येथे स्मशानभूमी शेडसाठी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर

Mar 16, 2025 - 07:49
 0  255
भिगवण येथे स्मशानभूमी शेडसाठी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर

आय मिरर (निलेश मोरे)

भिगवण येथील वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शेड च्या कामाचे नुकतेच भूमिपूजन संपन्न झाले. कॅबिनेट मंत्री दतात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १७ लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे अजिंक्य माडगे यांनी दिली.

 

भिगवण वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी शेडची व्यवस्था होती मात्र नवीन सुशोभीकरण करताना शेड काढल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांनी याबाबत मंत्री दतात्रय भरणे यांच्याकडे मागणी केली होती. याच मागणीची तातडीने दखल घेत मंत्री भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीतून १७ लाख रुपयाचा निधी मंजूर केला. 

या शेडचे नुकतेच भूमिपूजन आज करण्यात आले. यावेळी सरपंच गुराप्पा पवार उपसरपंच सत्यवान भोसले, पराग जाधव , आण्णासाहेब धवडे, अशोक शिंदे सचिन बोगावत, बापूराव थोरात, संजय देहाडे, तुषार क्षिरसागर, अजिंक्य माडगे, प्रदीप वाकसे, जावेद शेख, आप्पासाहेब गायकवाड, अमितकुमार वाघ, दत्तात्रय धवडे, तानाजी वायसे, संदीप वाकसे, मोहन शेंडगे, अनिल तांबे, वैभव देवकाते, रोहित भरणे, अमोल देवकाते, शुभम शेलार, रोहित शेलार, विक्रम देवकाते , निखील बोगावत, अमोल वाघ, आकाश उंडाळे, दत्तात्रय पाचांगने, सुरेश बिबे, योगेश चव्हाण, दिनानाथ मारणे, भाऊसाहेब भरणे, संदीप शेलार उपस्थित होते.

दफनभूमी शेडसाठी प्रयत्न करणार

अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा स्मशानभूमी निवाराशेड प्रश्न दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मार्गी लागत आहे. तसेच दफनभूमी निवाराशेड व सुशोभीकरण यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- अजिंक्य माडगे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow