हर्षवर्धन पाटलांच्या हस्ते शुक्रवारी बावडा परिसरात 25 कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने 

Jul 28, 2024 - 14:26
 0  429
हर्षवर्धन पाटलांच्या हस्ते शुक्रवारी बावडा परिसरात 25 कोटींच्या विकास कामांची भूमिपूजने 

आय मिरर                      

बावडा परिसरातील 5 रस्त्यांच्या एकूण 25 कोटी रुपये निधीच्या विविध कामांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 2 ) आयोजित करण्यात आले आहे.

विधानसभेचे पडघम वाजण्यापूर्वीचं इंदापूरात आत्तापासूनचं राजकारण तापू लागल्याचं पहायला मिळतयं. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी "इंदापूर तालुका विकास आघाडी" ची तयारी केली असून 1 आँगस्ट रोजी बावडा गावात पहिली शाखा काढली जाणार आहे. तर सध्या संवाद मेळाव्याच्या माद्यमातून हर्षवर्धन पाटील आपले ग्राउंड अधिक मजबूत बनवत आहेत.अशातचं आता बावडा परिसरात 25 कोटींच्या रस्त्यांच्या कामाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडून होम पिचमधून अधिकचं मताधिक्य मिळवण्याचं पाटील यांचा प्रयत्न आहे.

हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते भूमिपूजनाचे कार्यक्रम होणारे रस्ते पुढीलप्रमाणे -

1) बावडा (रा.मा.120) ते निरनिमगाव जिल्हा हद्दीपर्यंत इ.जि.मा. 213 ची सुधारणा करणे (रु.9 कोटी),

2) बावडा (प्र.जि.मा. 86) काकडे वस्ती-शेटे वस्ती ते सावंत वस्ती बावडा ग्रा.मा.200 रस्ता करणे-(रु.4 कोटी),

3) टणु रा.मा.120 ते टणू (चव्हाण वस्ती) बंधारा ते गावठाण ग्रा.मा. 202 रस्ता सुधारणा करणे - (रु.4 कोटी),

 4) वालचंनगर- सराफवाडी- रेडा- शहाजीनगर -भोडणी ते राज्यमार्ग 125 रस्ता रुंदीकरण करणे प्र.जि. मार्ग 126 कि.मी.18/00 ते 23/00 सुधारणा करणे- (रु.4 कोटी),

 5) वकीलवस्ती रा.मा.125 ते भांडगाव (प्र.जि. मार्ग 86 पर्यंत) रस्ता करणे ग्रा.मा.77 - (रु.4 कोटी).     

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पाठपुरावा करून या 5 रस्त्यांच्या कामासाठी महायुती सरकारच्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 च्या पावसाळी पुरवणीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकूण रु. 25 कोटींचा निधी मंजूर केला आहे. आता या कामांची टेंडरही देण्यात आलेली आहेत. सदर रस्त्यांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम शुक्रवारी खालील वेळे प्रमाणे संपन्न होणार आहेत. 

भोडणी - सकाळी 9 वा., वकीलवस्ती - 10 वा., बावडा (रत्नप्रभादेवीनगर) - 11 वा., बावडा (शेटे- काकडे- सावंतवस्ती) - दुपारी 12 वा., टणू - 1 वा. 

तरी वरील भूमिपूजनांच्या कार्यक्रमांना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील संपर्क कार्यालय इंदापूर यांचेकडून करण्यात आले आहे.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow