भिगवण ट्रॉमा केअर सेंटर मध्ये अत्याधुनिक उपकरणे बसून तात्काळ चालु करा - मराठा महासंघाची मागणी 

Feb 3, 2024 - 15:59
 0  787
भिगवण ट्रॉमा केअर सेंटर मध्ये अत्याधुनिक उपकरणे बसून तात्काळ चालु करा - मराठा महासंघाची मागणी 

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

भिगवण परिसरातील सर्व नागरिकांना वरदान ठरलेली ट्रॉमा केअर सेंटरची बिल्डिंग गेल्या अनेक वर्षापासून तयार झालेली आहे. सदर ट्रॉमा केअर सेंटर मध्ये तज्ञ डॉक्टर ,आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक मशनरी व लागणारी साधन सामग्री नसल्यामुळे त्याचा कोणासही उपयोग होत नाही, त्यामुळे या ठिकाणी अत्याधुनिक उपकरणे बसून तात्काळ हे सेंटर कार्यान्वित करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अँड. पांडुरंग जगताप यांनी यासंदर्भातील लेखी निवेदन इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांकडे दिले आहे.

जगताप म्हणाले की, सदर ट्रॉमा केअर सेंटर बांधून पूर्ण होऊन चार-पाच वर्षे झाले असतानाही पूर्ण क्षमतेने चालू झालेले नाही. भिगवण परिसरातील नागरिकांना सदर शासकीय दवाखान्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे गेले अनेक वर्षापासून नागरिकांची गैरसोय होत आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये उदासीनतेची भावना निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे सदर ट्रॉमा केअर सेंटरला आवश्यक ती यंत्रणा पुरून ते तात्काळ चालू होणे अत्यंत गरजेचे आहे. 

सदर ट्रॉमा केअर सेंटर तात्काळ चालू होऊन गोरगरीब नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देणे आवश्यक असल्यामुळे त्याची शासन पातळीवर पूर्तता करावी ही संघटनेची मागणी आहे. 

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष ॲड पांडूरंग जगताप, भिगवण शाखा अध्यक्ष छगन वाळके,खजिनदार अशोक साळुंके,युवा नेते अजिंक्य माडगे,मदनवाडीचे सामजिक कार्यकर्ते नानासाहेब बंडगर,तक्रारवाडी मां सरपंच सतीश वाघ इत्यादी उपस्थित होते. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow