ते पोलिसांना आव्हान देत आहेत का ? बुलेटमधून फाडफाड आवाज करीत फटाकड्या फोडणाऱ्यांवर इंदापूर पोलीस कारवाई करणार ?

Feb 3, 2024 - 07:17
 0  889
ते पोलिसांना आव्हान देत आहेत का ? बुलेटमधून फाडफाड आवाज करीत फटाकड्या फोडणाऱ्यांवर इंदापूर पोलीस कारवाई करणार ?

आय मिरर(देवा राखुंडे)

इंदापूर शहरात कानठळ्या बसतील असा फाडफाड आवाज करत बुलेटमधून फटाकड्या फोडण्याचे तसेच वेगाचा नियम मोडीत समोरच्याचा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत.यामध्ये अल्पवयीन आणि महाविद्यालयीन तरुणांचे प्रमाण जास्त आहे.मात्र या हुल्लडबाज तरुणाचा आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो आहे. विशेषत: लहान मुले तसेच वृद्ध आणि महिलांनाही हा त्रास सहन करावा लागतो. याबाबत इंदापूर पोलिस प्रशासनाने अशा वाहनावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.त्यामुळे असा नियम धाब्यावर बसवून कर्कश्य आवाज करणारांवर इंदापूर पोलीस कारवाई करणार का ? हे पहावे लागेल.     

याबाबत अधिक माहिती अशी की,शहरात गेल्या काही दिवसांपासून काही तरुण महागड्या दुचाकी गाड्या घेऊन सकाळ, दुपार, संध्याकाळच्या प्रहरात फटाके वाजल्याप्रमाणे बुलेट वरून सुसाट फेऱ्या मारत सायलेन्सर जोरजोरात आवाज काढतात.    

यावेळी इंदापूर नगरपालिका समोरील असणाऱ्या कॉलेज, हायस्कूल रोडवर एका बुलेटवर तिघे -चौघे बसून हिरोगिरी करत एक प्रकारची दहशत वाजवण्याचा प्रयत्न करत असतात. त त्यामुळे आता ते एकप्रकारे पोलिसांना आव्हानच देत आहेत का ? असेच चित्र निर्माण झाल्यासारखे वाटत आहे.       

इंदापूर पोलिसांकडून गेल्या महिन्यापासून नो पार्किंग मधील वाहनांवर कारवाई करत बेशिस्त वाहनधारकांवर वचक बसवण्याचा प्रयत्न करत आहेत.अशातच या प्रकारच्या स्टंटबाजीमुळे कॉलेजच्या मुली,वृध्द त्याचप्रमाणे हायस्कूलमधील लहान मुले यांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे अशा प्रकारची स्टंटबाजी करत दहशत माजवणाऱ्या हिरोंवर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे. तरुण मुलं मोठ्या आवाजातील सायलेंसर लावलेल्या बाइक चालवतात. अशाप्रकारच्या बाईकमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने बाईकला लावण्यात आलेले मोठ्या आवाजातील सायलेंसर काढून जप्त करण्याची मोहीम सुरू करण्यात यावी अशीच इंदापूरकरांची मागणी आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow