अकोले येथे चोरट्यांचा धुमाकूळ, घरफोडी करीत रात्रीत पाच लाखांच्या सोन्याचा दागिन्यांचा ऐवज व रोख साठ हजार रुपये लंपास

आय मिरर (विजयकुमार गायकवाड)
अकोले-येथे (शनिवारी) रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन वस्त्यांवर घरफोडी करीत पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.मध्यरात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास दराडे वस्ती एक व दराडे वस्ती दोन व गायकवाड वस्ती येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील साहित्य विस्कटून दागदागिने शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच दराडे वस्तीवरील दत्तात्रय दराडे यांच्या घरातील पेटी लंपास करून उसाच्या शेतात फेकून देऊन त्यातील दागिने नऊ तोळे दागिने व रोख साठ हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.मात्र जाताना त्याच वस्तीवरील प्रशांत बुधावंत या व्यक्तीची दुचाकी गाडी चोरून नेऊन बिल्ट कंपनी जवळ सोडून चोर निघून गेले आहेत.या झाल्या प्रकारांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या पाऊस झाल्याने लोक रात्री शेतात पाणी देण्यासाठी काही जात नाहीत त्यामुळे या शांततेचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.या घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून श्वानपथक आणि ठसे तपासणी करून पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.याबाबत गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहून ग्रामप्रशासने गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?






