भिगवण नजीक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लावलेला फ्लेक्स अज्ञाताने फाडला

Nov 21, 2023 - 07:25
 0  324
भिगवण नजीक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लावलेला फ्लेक्स अज्ञाताने फाडला

आय मिरर

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज स्वामी चिंचोली यांच्या वतीने भिगवण नजीक पुणे सोलापूर मार्गावर लावलेला गाव बंदीचा फ्लेक्स अज्ञात समाजकंठकाने फाडला आहे. मनोज जरांगे यांच्या फोटोला काळे फासत त्यांचा फ्लेक्स वरील फोटो फाडण्यात आलाय.काळ्या शाईची रिकामी बाॅटल घटनास्थळी आढळून आली असून जरांगे पाटील यांच्या फोटोचा फाडलेला भाग अज्ञात व्यक्ती घेऊन गेली आहे.

तसेच सदर स्वामी चिंचोली गावामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाची गेले पंधरा दिवसांपूर्वी शाखा स्थापन केलेली आहे सदर शाखेचाही बोर्ड सदर समाजकंटकाने वाकवलेला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या अंबड येथील सभेमध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे अज्ञात समाजकंटकाने हे कृत्य केल्याचा आरोप सकल मराठा समाज स्वामी चिंचोलीच्या वतीने केला असून मंत्री छगन भुजबळ व फ्लेक्स फाडणारी अज्ञात व्यक्ती विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांकडे करण्यात आली आहे.कारवाई न झाल्यास २५ नोव्हेंबर रोजी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

कायदा हातात घेऊ नये - पोलीसांचे आवाहन…

सदर निवेदन स्वीकारताना पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले की आरोपींविरुद्ध आम्ही तात्काळ कायदेशीर कार्यवाही करू सर्वांनी शांतता बाळगावी कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow