जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज ; पुण्याच्या भिगवण मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे नोंदवला जाहीर निषेध
आय मिरर (विजयकुमार गायकवाड)
जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे अंतरावली सराटी इथं हा प्रकार घडला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथं आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. या आंदोलनावेळी पोलिसांनी हा लाठीचार्ज केलाय. यात काही आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.
या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटण्यास सुरवात झाली असून पुणे जिल्ह्यातील भिगवण मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. भिगवण शाखेच्या वतीने हा निषेध नोंदवण्यात आला असून आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, जाहीर निषेध जाहीर निषेध आंदोलन दडपणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध अशी घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे.
What's Your Reaction?