भिगवण मधील शासकीय विश्रामगृहास कायमचं असतो टाळा

Sep 1, 2023 - 14:43
 0  116
भिगवण मधील शासकीय विश्रामगृहास कायमचं असतो टाळा

आय मिरर (विजयकुमार गायकवाड)

पुणे ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील शासकीय विश्रामगृह कायमच बंद असल्याचे दिसून येत आहे. पुणे ते सोलापूर अंतर 250 किलोमीटर इतके असून पुण्याहून सोलापूर कडे जाताना व सोलापूरहून पुण्याकडे येताना भिगवण हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी अनेक राजकीय सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर महिला वर्ग विश्रांतीसाठी थांबतात परंतु हे विश्रामगृह कायमचे बंद असते त्यामुळे अनेक प्रवाशांचे गैरसोय होत आहे.

या विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे भिगवण येथील उपअभियंता सुर्वे यांच्याकडे दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास टाळाटाळ केली. याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow