बिग ब्रेकिंग | पुणे सोलापूर नगर साठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण मायनस मध्ये.....

आय मिरर
पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायनी ठरलेलं उजनी धरण आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास मायनस मध्ये गेलेल आहे. उजनी धरण प्रशासनाकडून सकाळी सहा वाजता देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार उजनी धरण सध्या 0.06 टक्के वजा मध्ये आहे. सध्या उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 63 पूर्णांक 62 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे.
उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही 123 टीएमसी इतकी आहे.जेव्हा उजनी धरण 100 टक्के क्षमतेने भरतं तेव्हा उजनी धरणात 117 टीएमसी इतका पाणीसाठा मावतो त्यापैकी 54 टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून ग्राह्य धरला जातो तर उर्वरित 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो आणि आज उजनी ही मायनस मध्ये म्हणजे मृत पातळीत गेलेली आहे.
मागील वर्षी 21 जानेवारी 2024 रोजी उजनी धरण हे मायनस मध्ये गेल होतं, समाधानकारक पाऊस झाल्याने उजनी धरण 5 ऑगस्ट 2024 रोजी 100 टक्के क्षमतेने भरलं होतं.त्यादिवशी उजनी धरणात 117 टीएमसी इतकं पाणीसाठा होता. यावर्षी मात्र मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास अडीच महिने उशिराने उजनी धरण मायनस मध्ये गेल आहे. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवणूक क्षमतेच्या 63 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
साखर कारखाने,शेकडो उपसा सिंचन योजना आणि लाखो हेक्टर शेती उजनीवर अवलंबून...
उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने, नगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत या सोबतच सोलापूर शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि एकूणच शेकडो लहान मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या उपसा सिंचन योजना आणि सोलापूर व पुणे जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी उजनी धरण हे एक धरण आहे.
पावसाळा सुरू होण्यास पुढे जवळपास दोन अडीच महिन्याचा कालावधी ओलांडावा लागणार आहे त्यामुळे या कालखंडात आहे त्या पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. शिवाय उर्वरित पाण्याचे पाण्याचे देखील काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
What's Your Reaction?






