माता रमाई महिलांसाठी आदर्शवत - मा.नगराध्यक्षा अंकिता शहा

Feb 8, 2024 - 18:19
 0  340
माता रमाई महिलांसाठी आदर्शवत - मा.नगराध्यक्षा अंकिता शहा

आय मिरर(देवा राखुंडे) 

माता रमाई यांनी बाबासाहेबांसाठी जीवन संघर्ष केला. किमान महिलांनी आपल्या मुलांना घडविण्यासाठी जीवन संघर्ष करावा. आपल्या मुलांना संघर्ष आणि कष्टाची सवयी लहानपणापासून लावली पाहिजे. आयुष्य हे संघर्षाने भरलेले असते. कोणतेही यश संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही म्हणूनच माता रमाई या सर्व महिलांसाठी आदर्शवत आहेत त्यांचा आदर्श सर्व महिलांनी घ्यावा असे प्रतिपादन इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले.

      

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुनंदा ननवरे, मैत्रीण ग्रुपच्या अध्यक्षा अनुराधा गारटकर उपस्थित होत्या. इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका राजश्री मखरे, उमा इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले.      

इंदापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डाॅक्टरेट पुरस्कार मिळाल्याबद्दल रेश्मा शेख व उत्कृष्ट पत्रकारितेसाठी मोहिनी शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला तर जेष्ठ महिला, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचाही सन्मान करण्यात आला. 

यामध्ये जेष्ठ महिला हौसाबाई मखरे, तप्ताबाई मखरे, जिजाबाई मखरे, कौशल्या कडवळे, सावित्रीबाई मखरे, शकुंतला मखरे, जनाबाई मखरे, राघाबाई मखरे, राहीबाई मोरे, उषाबाई मोरे, शालनबाई मखरे, आम्रपाली मखरे तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यामध्ये पल्लवी कडवळे, सुनिता अवघडे, शुभांगी गानबोटे, उषा शिंदे, उज्वला मखरे, कांचन गाडेकर, वैशाली साबळे इत्यादींचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर मखरे, अजय कांबळे, विजय मखरे, यशपाल मखरे, अभिजित मखरे, सम्यक मखरे, समीर लोंढे, अनार्य मखरे, शेखर मखरे, विकी खरे, आशुतोष मखरे, अनिकेत खरात, ओंकार गायकवाड इत्यादींनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow