मंथन परीक्षेमध्ये एल.जी.बनसुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मारली बाजी

Apr 16, 2025 - 09:41
Apr 16, 2025 - 09:41
 0  196
मंथन परीक्षेमध्ये एल.जी.बनसुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मारली बाजी

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंथन स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरीय घवघवीत यश संपादन केले.मंथन परीक्षेमधून मुलांची भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी व त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा म्हणून विद्यालयामध्ये इयत्ता 1 ली पासूनच मंथन परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते व मुलांना भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयार केले जाते. 

शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यालयातील एकूण 90 ते 100 विध्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग दर्शवला होता.त्यापैकी 5 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मजल मारली आहे. 

यामध्ये कु .भैरवी चैताली प्रितम लावंड (इयत्ता -1 इंग्लिश )राज्यस्तरीय तृतीय, कु.श्रेयश माधुरी दिनेश गायकवाड (इयत्ता -2 इंग्लिश )राज्यस्तरीय पाचवा, कु. पूर्वा माया सदानंद भुसे (इयत्ता -2 इंग्लिश )राज्यस्तरीय सातवा, कु. अलिना फौजीया फिरोज सय्यद( इयत्ता -2 इंग्लिश ) राज्यस्तरीय आठवा,कु. वेदांत निलम रमेश लावंड.(इयत्ता -2 इंग्लिश ) राज्यस्तरीय आठवा या सर्व विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षक चैताली प्रितम लावंड आणि तनुजा अनिल फुगे यांच्या अथक परिश्रमातून हे यश संपादन झाले आहे.

संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्षा नंदा बनसुडे, उपाध्यक्ष शितल शहा, सचिव नितीन बनसुडे,प्रिन्सिपल वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, समन्वयक सुवर्णा वाघमोडे, विभाग प्रमुख प्रवीण मदने, तेजस्विनी तनपुरे, ज्योती मारकड, सीमा बाराते व पालक वर्गातून सदानंद भुसे, आकाश नगरे यांनी तसेच सर्व शिक्षक वृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांनाचा गुणगौरव व कौतुक करून अभिनंदन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow