धक्कादायक ! बारामतीत कोयत्याने वार करून तरुणाचा खून

Dec 20, 2024 - 08:37
 0  897
धक्कादायक ! बारामतीत कोयत्याने वार करून तरुणाचा खून

आय मिरर

बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने निघृण वार करत खून करण्यात आलाय. या प्रकरणाने बारामती हादरली आहे.गेल्या सहा महिन्यातील हा तिसरा खुनाचा प्रकार आहे.

रात्री साडेदहा च्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर अनिकेत सदाशिव गजाकस या युवकावर कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने अनिकेत गजाकस याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत हा मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा संशय आहे.

याप्रकरणी अभिषेक सदाशिव गजाकस यांच्या फिर्यादीवरुन बारामती शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन ठेके करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow