कोरेगाव पार्क परिसरात आढळला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह, पुण्यात खळबळ

Mar 17, 2024 - 16:01
 0  1374
कोरेगाव पार्क परिसरात आढळला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह, पुण्यात खळबळ

आय मिरर

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळून आला आहे. दत्तात्रय कुरळे असं या पोलीस उपनिरीक्षकांचं नाव आहे.

ते पुणे पोलिसांच्या मोटर परिवहन विभागात कार्यरत होते. दरम्यान काल नागपुरात पोलीस स्टेशनमध्येच एका पोलिसावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला होता, ही घटना ताजी असतानाच आता पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांचा मृत्यू नेमका काशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव पार्क परिसरात पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळून आला आहे, या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दत्तात्रय कुरळे असं या पोलीस उपनिरीक्षकांचं नाव आहे. ते पुणे पोलिसांच्या मोटर परिवहन विभागात कार्यरत होते. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow