महायुतीला धक्का ! धनंजय मुंडेंच्या या खास व्यक्तीने दिला राजीनामा

Mar 20, 2024 - 14:37
Mar 20, 2024 - 14:39
 0  1496
महायुतीला धक्का ! धनंजय मुंडेंच्या या खास व्यक्तीने  दिला राजीनामा

आय मिरर

लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. देशभरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्येक पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे. एकीकडे पक्षातून उमेदवार कोणते द्यायचे यावर वाटाघाटी सुरू असताना आता महायुतीला मोठा धक्का बसला आहे.महायुतीमधून धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांनीच त्यांची साथ सोडली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि धनंजय मुंडे यांचे निकटर्तीय बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच महायुतीला मोठा धक्का समजला जात आहे.

बजरंग सोनवणे यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून भाजपच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती.. गेल्या काही दिवसापासून बजरंग सोनवणे नाराज होते. आज त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर राजीनामा पोस्ट केला आहे..बजरंग सोनवणे हे आज पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थिती शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक एकूण 5 टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान. नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान. दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणगंले, चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ,पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, वेस्ट दक्षिण मुंबई, पूर्व मुंबई, मध्य उत्तर मुंबई, मध्य दक्षिण मुंबई, दक्षिण मुंबई.

कोण आहेत बजरंग सोनवणे ?

शेतकरी पुत्र म्हणून बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला.

बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

येडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखान्याचे ते चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत.

केज विधानसभा मतदार सघात बजरंग सोनवणे यांचा स्वतःचा एक वेगळा गट आहे.

बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते.

बजरंग सोनवणे यांच्या कन्या डॉक्टर हर्षदा सोनवणे यांचा केज नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला, तो जिव्हारी लागला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow