इंदापुरातील वरकुटे पाटी नजीक अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात,सुदैवाने जीवितहानी नाही

Dec 4, 2023 - 19:54
 0  863
इंदापुरातील वरकुटे पाटी नजीक अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात,सुदैवाने जीवितहानी नाही

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील वरकुटे पाटी नजीक अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झालाय. पुण्याच्या दिशेने लोखंडी पत्रा घेऊन निघालेल्या ट्रक चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला आणि त्याने पुढील ट्रकला पाठीमागून धडक दिलाने हा अपघात घडल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिलीय.

महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वरकुटे गावचे हद्दीत सोमनाथ दत्तात्रेय मिसाळ 35 वर्षे राहणार सांगोला जिल्हा सोलापूर हे आपले ताब्यातील टेलर नंबर MH 46 BB 0039 हा सोलापूर बाजू कडून पुणे बाजूकडे घेऊन जात असताना पाठीमागून येणारा कंटेनर नंबर एम एच 12 वी टी 2983 वरील चालक आशिष सलगर वय 32 वर्षे राहणार बीड याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदरच्या कंटेनर ची पुढील टेलरला धडक बसून अपघात झाला.

सदर अपघातात आशिष सलगर यास किरकोळ मार लागल्याने त्यास एन एच आय चे ॲम्बुलन्स मधून उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे उपचार कामी पाठवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलीस मतद केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक फासगे व त्यांच्या सहका-यांनी भेट दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow