संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट; एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

Apr 3, 2024 - 08:12
 0  1143
संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट; एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

आय मिरर

छत्रपती संभाजीनगरमधील छावणी भागात आज पहाटेच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अग्नीकांडामधून 9 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावली होती. त्याचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कापडाच्या दुनाला लागलेल्या भीषण आगीमध्ये या दुकानाच्या वरील मजल्यावरच्या घरातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुकानामध्ये रात्री इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावण्यात आली होती. याच बॅटरीचा स्फोट होऊन आग लागल्याचा अंदाज आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow